खऱ्या अर्थाने इंग्रजांचा जम अथवा त्यांचे भारताबद्दलचे स्वारस्य हे १८५० नंतर वाढू लागले. त्या अगोदर त्यांचे नौकर शहा हे तेथे गूंड अथवा मवाली या पध्दतीच्या साच्यातून आलेले होते. गावावरुन ओवाळुन टाकावे असे लोकं येथे येत असत. त्या मुळे कोणताही विधी निषेध त्यांना नसे. १८५० या दरम्यान ब्रिटिशाच्या संसदेला भारतामध्ये रस आणि त्याप्रकारे चांगले आधिकारी पाठवणे त्यांनी सुरु केले.
ब्रिटिशांच्या आधिकाऱ्याची उतरंड बघीतली असता जिल्हाधिकारी श्रेणीचा आधिकारी हा महत्वाचा दूवा समजला जावा. ( भारतीय जनता आणि ब्रिटिश संसद). त्यांचे वैशिष्ठ म्हणजे अगदी तरूण वयातच ( २१/ २५ वर्ष वय) ते भारतात येत. सर्वसाधारणपणे त्यातल्या त्यात ते बऱ्यापैकी सुसंस्कृत समजल्या गेलेल्या घरातून येत असत. बरे ते अश्या प्रांतात जात तेथे शेकडो मैल त्यांच्या वंशातील, जातीतील इतकेच कश्याला त्यांच्या भाषेचा गंध असलेला व्यक्तीही दिसणे दुरापास्त असे. त्यांच्या कडुन अश्या स्वदेशी लोकांवर राज्यकारभार करण्याचे उत्तरदायीत्व सोपावलेले असे. कायदा आणि सुरक्षा ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असे. आणि ही जबाबदारी पाळतांना लष्कराचे साह्य घेणे हे नामुष्कीचे अथवा त्यातील कमी कौशल्याचे समजले जाई.
अशी धारणा आणि समज असलेल्या अश्या लोकांनी ब्रिटिश राज्याचे नाव आणि प्रतिष्ठा निश्चितच वाढवली असे अनुमान काढता येणे सहजच शक्य आहे.
अश्या लोकांनी येथील कला, भाषा, संस्कृती , लोकजीवन, बांधकामे, शिक्षण मध्ये विधायक रस घेतला. त्यामुळे अपवादात्मक डायर, ओडवायर अश्या लोकांचा अपवाद केला तर ब्रिटिश सिव्हिल सर्विस हे दोन्ही बाजुनी मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानचिन्ह समजले जाई.
ब्रिटिशांच्या काळखंडाचे अभ्यासकांनी या बाबीचा जरूर विचार करावा.
स्त्रोत > पिटर ड्रकर याचे व्यवस्थापनावरील लेख आणि होम्सच्या कथा.
द्वारकानाथ