समजा इंग्रजांचा अंमल न येता तर भारताची औद्योगिक परिस्थिती अफगाणिस्तान पेक्षा वेगळी नसती असे वाटते.

हे तितकेसे पटले नाही. इंग्रजांनी हिन्दूस्थान-पाकिस्तान दोघांनाही एकाच वेळी स्वातंत्र्य बहाल केले. आज हिन्दुस्थानने केलेली प्रगती पाकिस्तानच्या कितीऽऽऽऽऽतरी पट जास्त आहे. एशियातल्या, हिन्दूस्थानच्या वाढत्या महत्त्वाने अमेरीका अस्वस्थ आहे. किती तरी छोट्या छोट्या देशांचे हिन्दूस्थान हे आशा स्थान आहे. ही प्रगती हिन्दुस्थानने 'इंग्रजां'च्या मदती शिवाय केली आहे. 'इंग्रज'गेल्या नंतर केली आहे.