पूर्वी, कुठल्याही लेखनावर प्रतिसाद दिला कि ते लेखन 'फलकावर' सगळ्यात वरती यायचे.
तसेच, नविन प्रतिसाद असतील तर तेथे 'मुख्य फलकावरच' लाल रंगातली खुण उजव्या कोपऱ्यात (मुळ लेखन उघडायला न लागता) दिसायची.

हल्ली तसे होत नाही. त्यामुळे प्रत्येक लेखन 'उघडून' त्याच्या तळाशी जाऊन नविन प्रतिसाद आहेत का हे शोधावे लागते. यात बराचसा वेळ जातो. हल्ली मनोगतावर लिहीणाऱ्यांची संख्या वाढली आहे. (अभिनंदन, प्रशासकसाहेब). पण त्यामुळे वरील अडचण येत आहे.
कांही उपाय आहे का?