वा भास्करराव,
आपले टिपणी मोठी मार्मिक आहे.
मिलिंद,
आपण वापरलेले शब्द, संदर्भ आणि मदिराप्राशनाचे एका मद्यप्याच्या भूमिकेतून केलेले समर्थन मजेदार आहे.
'हा माझा मार्ग एकला' मधे मद्यविक्रेता दारुड्याच्या भूमिकेतील राजाभाऊंना म्हणतो: "शंकरराव, एवढी दारू पिणे बरे नव्हे." तेव्हा पिऊन तर्र झालेले शंकरराव उत्तरतात, "अहो, दारू पिणेच मुळात वाईट आहे."
आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर म्हणतात:
"प्यायले जे खूप ज्यांना वाटे परी झाली कमी
निर्मिली मी फक्त माझी त्यांच्याचसाठी शायरी.
...
सांगतो इतरांस 'बाबा' वाचा सुखे ज्ञानेश्वरी!"
[विनायकराव, क्षमा असावी :) ]
आपला