या आणि अशा प्रकारचे दुसरे एक लिंबू लोणचे छान लागते. माझ्या आईने अशीच एक रेसिपी सांगितली आहे पण मी अजून करून पाहिली नाही. कूकरमध्ये डब्यातच लिंबे शिजवायची पण फोडी न करता. आणि गार झाल्यावर बियांसकट व सालींसकट ही लिंबे मिक्सर मधून बारीक करायची. आणि मग त्यात लाल तिखट, मीठ व साखर घालायचे. हे लोणचे जेलीसारखे होते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोणचेही खूप छान लागते. झटपट होते. फोडीमध्ये शिजताना थोडी हळद व चवीपुरते मीठ घालूनही छान होते.