राजकारण करताना राजकियपक्ष सर्वच जातिभेदाला धर्मभेदाला खतपाणी घालतात, कारण त्यांना त्याचा उमेदवारच निवडून यायला हवा असतो. व त्यामुळेच ते उमेदवार ठरवताना त्याचे चारित्र्य पण बघत नाहीत मग असे उमेदवार मिळाले तर भ्रष्टाचार वाढणारच तेव्हा निवडणुक पद्धतीत सुधारणा आवश्यकच आहे. त्या साठी तुम्ही सुचवलेला उपाय चालू शकेल .
आता राजकीय पक्ष्यांनी दाखवून दिल्या प्रमाणे जरी पक्ष असले तरी त्याच्या विचारांशी सर्वच सहमत नसतात व मग पैसे घेऊन विरोधी मतदान करतात.म्हणून जी पक्षीय लोकशाही पद्धत आपण स्वीकारली त्याचा उपयोग होत नाही म्हणून निवडणुका कोणालाही लढविता याव्यात या साठी कमी डिपॉझिट ठेवून कोनालाही निवडणुक लढवायला द्यावी व निवडणुक जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुका यातील अंतर फक्त काही वेळाचेच असावे. थोडक्यात उमेदवाराला प्रचाराला फारसा वेळ ठेवू नये. म्हणजे थोड्याफार प्रमाणात तरी खरे समाजसेवा करणारे निवडले जातील.