राज्यकारभारातली अनास्था, अनागोंदी आणि रयतेची दुर्दशा आपण गेली एक हजार वर्षे अनुभवीत आहोत. आपले राजे महाराजे, सामंत, वतनदार, देसाई-देशमुख, पाटील, खोत इ. चैनी, विलासी होते, ते मगरूरीने वागत, भविष्याचा वेध घेण्याइतकी त्यांची व सर्वसामान्य जनतेचीही कुवत नव्हती हेच सत्य आहे. त्यामुळे आज भ्रष्टाचार शिगेला अथवा टिपेला पोचला आहे हे पटत नाही.आपल्याकडे युरोपातल्या रनाय्सांस सारखी कोणतीही लोकचळवळ (ज्यातून राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा निषेध आणि त्यांना विरोध करणाऱ्या प्रॉटेस्टंटस चा उदय झाला) मध्ययुगात निर्माण झाली नाही. त्याला परिस्थितीजन्य कारणे असतीलही. पण ही स्थिती सामान्य जनतेला इतकी जाचक वाटत होती की तिने सुव्यवस्था आणणाऱ्य इंग्रजांचे खुल्या दिलाने स्वागत केले.

आता मात्र सामान्य माणूस थोडा जागा झाल्यासारखा वाटतोय खरा.