कदाचित याचे उत्तर असेही शोधता येईल की ब्रिटिशांच्या जोखडाखाली असणाऱ्या देशांची आजची स्थिती कशी आहे? उदा. चीन.
दुसरे आजची प्रगती ही सामूहिक प्रगती आहे त्यातून याचे आणि त्याचे असे निवडणे अवघड ठरेल.
आज जगात प्रगतीला हवे असणारे पोषक वातावरण ते कधी नसेल असे तयार झालेले आहे. उदा. भारतीय संगणक तज्ञ अमेरीकेमध्ये, भारतीय डॉक्टर्स ब्रिटन मध्ये अशी सरमिसळ आहे त्यामूळे नेमके श्रेय शोधणे अवघडच आहे.
पूर्वी शतकोन्शतके निर्वीवाद पणे जगाचे नेतृत्व मिळत असे आज दशकभरात अनेक घडामोडी घडत असतात.  आजचे नेते उद्या कर्जबाजारी होतील असेही दृष्य दिसू शकेल.
आज चीन-भारत हे महासत्ता होतील असे भाकित आहे तर उद्या अफ्रिका वगैरे महासत्ता होतील असे भाकित राहील.