या विषयावर बराच उलटसुलट वैचारिक  उहापोह करून, दाखलेबाजी करून  शेवटी बरोबर/ चूक असे काहीच नसते असा निष्कर्ष निघतो आणि त्यात व्यावहारिक दृष्ट्या फारशी चूकही नाही. या बाबतीत निव्वळ व्यावहारिक बाजू बघणारे सवडीशास्त्र पाळत ढीगभर वकिली युक्तिवाद सहज देउ शकतील यातही काही नवल नाही.

मला उपयुक्त वाटलेले एक थेट भाष्य : रमण महर्षी

ही एक सुचवणच आहे.  महर्षींच्या भाष्यात ठामपणा असला तरी आग्रह, हटवाद आणि अनाठायी युक्तिवाद कधीही नसायचा. भगवद्वीता/ ज्ञानेश्वरीतही त्रिविध (सात्विक, राजसी, तामस) आहारबद्दलची मार्गदर्शक तत्त्वे बर्यापैकी सविस्तर दिलेली आहेत. अमुक एक खावे आणि तमुक नको अशा याद्या (चेकलिस्ट) दिलेल्या नाहीत. तो विवेक ज्याचा त्यानेच केलेला बरा.