मांसाहारी लोक देवाचे भक्त नसतात का? नसू शकतात का? नसावे का?
आहाराचा आणि भक्तीचा, निर्मळ मनाचा काहीच संबंध नाही. 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' या भावनेने केलेला कुठलाही मिताहार हा सात्त्विकच असतो मग तो सामिष असो वा निरामिष.
आणि सामिष आहार केल्यामुळे अपराधी वाटण्याचेही कारण नाही. कारण भारतीयांपैकी ८५-९० टक्के लोक सामिष आहार करणारे आहेत.
मनाविरुद्ध, टोचणी लागण्याजोगे मात्र काही करू नये.