पण मनाला कुठेतरी ही गोष्ट खुपत राहते. आपण ज्यांना गुरु मानतो, ते जर मांसाहार करू नये असा संदेश देत असतील, तर ते पाळणे जास्ती महत्वाचे वाटते. फक्त गणपती / चतुर्थी / नवरात्र किंवा इतर सणवार असले कि मांसाहार करायचा नाही आणि इतर वेळेस चालू द्यायचं, हे काही पटत नाही. स्वत:लाच फसवत असल्याची भावना वाटत राहते.
प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे भक्ती करतच असतो. 
बाकी आपली आपली मते ... जपान सारख्या देशात जिथे शेती करणे जागेअभावी शक्या नाही, तिथल्या लोकांचे प्रमुख अन्न मासे असणे हे स्वाभाविक आहे !