जपानमध्ये शेतीयोग्य जमिनीच्या कमतरतेमुळे पुरेसे तृणधान्य उपलब्ध नसते, त्यामुळे अपरिहार्यता म्हणून ते मासे खातात असे जर तुम्हाला सुचवायचे असेल तर त्याच्याशी सहमत नाही. चीन पासून ते एशिया-पॅसिफिक मधल्या सर्व बेटांपर्यंत; म्हणजेच पूर्व, आग्नेय आशिया आणि पॉलिनेशिआ या विस्तीर्ण टापूतले मंगोलॉइडस आणि ऑस्ट्रेलॉइडस अशा दोनही वंशांचे लोक स्वेच्छेने आणि परंपरेने पूर्ण मांसाहारी आहेत; जरी त्यापैकी काही प्रदेशात बौद्ध धर्म प्रचलित असला तरी.

अमेरिका, रशिया(रश्या? )(मला पूर्वीचा यू. एस. एस. आर म्हणायचे आहे) आणि ऑस्ट्रेलिया हे देश प्रचंड प्रमाणात गहू पिकवतात तरीसुद्धा ते पूर्णपणे मांसाहारी आहेत.

शेवटी, पचेल ते खावे आणि रुचेल ते करावे हेच योग्य.

असो. इथे आणि इतरत्रही अशा स्वरूपाच्या धाग्यांवर प्रचंड धिंगाणा घातला गेलेला आहे. त्याची पुनरावृत्ती नको.