...एकदा का 'माझा मांसाहार' असे लेखाचे शीर्षक दिले, की तो पूर्णपणे लेखकाचा वैयक्तिक मामला झाला. खायचे तर खावे, नाही खायचे तर खाऊ नये. त्यामागची कारणमीमांसा लेखक जगाला देणे लागतही नाही, आणि जगाला अशा कारणमीमांसेच्या स्पष्टीकरणामध्ये रस असण्याचे काही कारणही दिसत नाही.

यापूर्वी (बहुधा*) इथे आणि इतरत्रही** अशा प्रकारची खाजगी आणि अनावश्यक स्पष्टीकरणे उगाचच दिली जाऊन प्रचंड वात आणला गेला आहे.*** त्याची पुनरावृत्ती नको.

तळटीपा:
* सविस्तर संदर्भ शोधण्यामागील वैयक्तिक कंटाळ्यास झाकण्याकरिता ही पळवाटवजा कॣप्ती बहुधा*(recursive) सर्वमान्य असावी. (चूभूद्याघ्या.*(recursive))
** याकरिता मात्र संदर्भ उपलब्ध आहे. कृपया यापुढील तळटीप पाहावी.
*** 'आत्मचरित्र' नावाचे एक जाँर - genre - खास याच कारणासाठी बनवले गेले आहे, असा आमचा सुशिक्षित कयास - educated guess - आहे. 'माझे सत्याचे प्रयोग' हे नाव या बाबतीत प्रकर्षाने आठवते. सुदैवाने संबंधित लेखकाने असा प्रकार (पक्षी: आत्मचरित्रलेखन) आयुष्यात पुन्हा केल्याचे ज्ञात नाही. (निदान मला तरी.) इतर चिल्लरखुर्दा उदाहरणेही (शोधल्यास) बहुधा पुष्कळ सापडावीत.