लेखकाने 'माझा मांसाहार' म्हटले असले तरी आपले म्हणणे गुलदस्त्यात (तसेही अलीकडे हार, गुलदस्ते वगैरेंमधून अत्यंत स्फोटक सामग्री लपवली/लपवून आणली-पाठवली जाते असे उघडकीला आल्यामुळे गुलदस्त्यांचीही बारकाईने तपासणी होते असे ऐकले आहे.) तर नाही ना ठेवले? या संस्थळावर सार्वजनिक वाचनासाठी आणि टीकाटिप्पणीसाठी मांडले ना? आम्हांलाही त्यावर आमचे 'वैयक्तिक' मत प्रतिसादातून मांडण्याचा आणि त्याच्या पुष्ट्यर्थ जमल्यास संदर्भ देण्याचा हक्क आहे हे मान्य व्हावे.
भवति-न-भवती व्हायचीच असेल तर होवो बापडी पण तेच (जुने) वादविवाद, तीच (जुनीपुराणी) विधाने,कारणे,स्पष्टीकरणे यांची पुनरावृत्ती होऊ नये असे वैयक्तिकरीत्या वाटले.
तसेही, सर्वच जुनेपुराणे फारसे संस्मरणीय अथवा स्मरणरंजक नसावे बहुधा.