वरील लेखात 'विधायक' हा शब्द कायदे बनवणारा ह्या अर्थी  वापरलेला आहे, असे मला वाटते. व्याकरणदृष्ट्या तो योग्य ठरेलही; परंतु मराठीत 'विधायक' हा शब्द  'निर्माण करणारा, घडवणारा' ('विघातक' च्या विरुद्ध) अशा काहीशा अर्थाने आधीच प्रचलित आहे. 'विधायक टीका करावी विघातक नको' असे आपण कित्येकदा म्हणतो/ऐकतो.

त्याऐवजी शासकीय कोशात सांगितलेला 'विधिनिर्माता' हा प्रतिशब्द मराठीत वापरणे जास्त उचित होईल असे मला सुचवावेसे वाटते.