लेखकाने 'माझा मांसाहार' म्हटले असले तरी आपले म्हणणे गुलदस्त्यात (तसेही अलीकडे हार, गुलदस्ते वगैरेंमधून अत्यंत स्फोटक सामग्री लपवली/लपवून आणली-पाठवली जाते असे उघडकीला आल्यामुळे गुलदस्त्यांचीही बारकाईने तपासणी होते असे ऐकले आहे. ) तर नाही ना ठेवले? या संस्थळावर सार्वजनिक वाचनासाठी आणि टीकाटिप्पणीसाठी मांडले ना?

नेमके हेच म्हणायचे आहे. लेखकाने काय खावे आणि काय खाऊ नये (आणि का), हा पूर्णपणे त्याचा वैयक्तिक मामला असल्याकारणाने, तमाम दुनियेस त्यात स्वारस्य असण्याची अपेक्षा करण्याचे लेखकास काहीच कारण नाही. सबब, आपले खाजगी मत असे सार्वजनिक वाचनासाठी आणि टीकाटिप्पणीसाठी मांडण्याची लेखकाची आवश्यकता समजली नाही.

पण आता (लेखकाने) मांडलेच आहे, तर...

आम्हांलाही त्यावर आमचे 'वैयक्तिक' मत प्रतिसादातून मांडण्याचा आणि त्याच्या पुष्ट्यर्थ जमल्यास संदर्भ देण्याचा हक्क आहे हे मान्य व्हावे.

अर्थात! होऊन जाऊ द्या!

तसेही अलीकडे हार, गुलदस्ते वगैरेंमधून अत्यंत स्फोटक सामग्री लपवली/लपवून आणली-पाठवली जाते असे उघडकीला आल्यामुळे...

अगदी अगदी!