जीवनातली कोणतिही गोष्ट असो जर मनात करू की नको असा संभ्रम असेल तर न करणं श्रेयस्कर असतं. साधा रस्ता देखील गर्दीच्या वेळी क्रॉस करू की नको असं वाटलं तर थांबणं सोयीचं होतं. खरेदीच्या वेळी देखील घेऊ की नको असं वाटलं तर सरळ 'न घेणं' उपयोगी होतं. याच एक साधं कारण आहे, तुम्ही मनाच्या चकव्यात सापडत नाही कारण मनच तुम्हाला एखादी गोष्ट करायला भरीला घालतं आणि मग पश्चाताप करायला लावतं. द बेस्ट सोल्युशन इन कन्फ्युजन इज टू ड्रॉप द डिसीजन, करून पहा आणि कळवा, तुमची सवय जाईल.

संजय