प्रवासी,

आपणास "I am feeling lucky" चे "आलिया भोगासी" हे भाषांतर आवडले? मला तर अजिबातच नाही रुचले.

"आलिया भोगासी" ( आलिया भोगासी असावे सादर... ) हे "आता दुसरा उपाय नाही, जे काही भोग आहेत ते भोगावयासच हवेत" अश्या अर्थी वापरले जाते. परंतु google वरील त्या बटणाचा अर्थ मात्र तसा नसून "शोधलेल्या पानांमधील पहिले पान मला दाखवावयास हरकत नाही, त्यातूनच हवी असलेली माहिती मला मिळेल याची मला खात्री आहे" अश्या अर्थी आहे.

त्यामुळे त्या बटणावर "आज नशीब जोरावर आहे" असे लिहिलेले असावयास हवे असे मला वाटते.

सहस्त्रबुद्धे, आपणास काय वाटते?

अमित चितळे