भक्ती ही intangible असते कारण ती वस्तू नाही तर भावना आहे. आणि भक्ती मग ईश्वराची असो, कुठल्या कलेची असो किंवा व्यक्तीची असो ती निर्मळच असते असे मला वाटते. कारण भक्ती म्हणजे आपल्या "आराध्याचे" गुण अवगुण मान्य करून त्याला सर्वस्व मानणे . मग आहार कुठला घेतला ? या वरून भक्ती डागाळलेली किंवा गढुळलेली कशी ठरेल ?
वर वर्णन केलेल्या प्रसंगातून - श्री गजानन महाराज हे शुद्ध शाकाहारी होते - असे म्हणता येईल. पण म्हणून समिष आहार वाईट असे सिद्ध होत नाहीये. किंवा त्या बाबत खुद्द महाराजांनी काही तर्क दिलेला दिसत नाही. 
गजानन महाराजांच्या भक्तांनी त्यांचे अनुकरण करून शाकाहारी व्हावं हे समजण्या सारखं आहे. पण समिष आहार करणाऱ्या व्यक्ती पाखंडी असतात, अथवा शुद्ध नसतात असा निष्कर्ष निघू शकत नाही. त्या मुळे जे महराजांचे भक्त नाहीत ते सहाजिकच त्यांचे अनुकरण करणार नाहीत . मग त्यांनी शाकाहारी का व्हावं ?
म्हणजे वरील कथा वर्णन करून आपल्याला काय सांगायचे आहे ते नीटसे समजत नाहीये.