यावरील चर्चा अतिशय रोचक होईल यात शंका नाही. जसजशी रेचकाची तीव्रता आणि वापराची वारंवारता वाढेल तसतसा अनुभवांतला रोचकपणाही वाढेल याची खात्री वाटते. तसेही, आहाराच्या धाग्यावर विरेचनाची अपेक्षा अनुचित ठरू नये. शिवाय, या बाबतीत म. गांधींची साक्ष काढण्यासही वाव आहे किंवा तशी ती काढण्यास प्रत्यवाय नसावा. कारण, कोणाही व्यक्तीची चौकशी करताना गांधीजींचा पहिला प्रश्न 'तुझा कोठा कसा काय आहे आज? (ठीक आहे ना? ) [How are your bowels today?(इथे अनेकवचन का बुवा?)] हा असे असे ऐकिवात आहे.