लेखकाला ' मांसाहार करावा कि करू नये' यावर चर्चा हवी असावी.
पण मग याचे साधे सोपे वैश्विक उत्तर 'खायचे तर खावे, नाहीतर खाऊ नये' असे असताना आणि ते केवळ आपण आणि मीच नव्हे, तर सावरकरांनीसुद्धा (कदाचित थोड्या वेगळ्या शब्दांत) देऊन झालेले असताना, त्यावर चर्चेचे प्रयोजनच काय?
शिवाय, लेखकाने आपल्या विचारांप्रमाणे स्वतःपुरता काय तो निर्णय घेऊन झालेलाच आहे. मग आता चर्चा कशासाठी? ('व्हॅलिडेशन' (मराठी?) हवे आहे काय?)