जर तर बद्दल-
भौतिक शास्त्रात uncertainty म्हणून एक प्रमेय आहे. त्याचाच एक भाग म्हणजे समांतर विश्वांची शक्यता. एखादी घटना घडली त्यापेक्षा वेगळी घडली असती, तर असे झाले असते असे आपण म्हणतो. समांतर विश्वांचे प्रमेय म्हणते, ती घटना 'तशी' ही घडली, पण तुम्ही 'अशी' घडलेल्या विश्वात आलात. 'तशी' घडलेले विश्व वेगळे झाले.

या कल्पनेवर आधारलेली एक गोष्ट डॉ जयंत नारळीकर यांनी आपल्या एका पुस्तकात सांगितलेली आहे. पानिपतावरील तिसऱ्या युद्धात सदाशिवरावभाउंवर शत्रूने सोडलेली गोळी त्यांना न लागता बाजूने जाते आणि ते युद्ध मराठे जिंकतात अशी ती गोष्ट आहे. त्यात त्यांनी विसाव्या शतकातील पेशवाईचे वर्णन केले आहे. भारतातील सर्वात प्रबळ सत्ता पेशवाई आहे, सर्व प्रकारची भौतिक प्रगती झालेली आहे असे ते वर्णन आहे. मजा येते वाचताना.

दुसरे, सावरकरांच्या एका जात-पात तोडक निबंधात त्यांनी आज पेशवाई असती तर कशी असती याचे वर्णन केले आहे. त्यात आज पेशवाई असती तर ती मुळात बलिष्ठ असती (अन्यथा नसतीच). आधुनिक विज्ञानाची कास धरल्या शिवाय ती बलिष्ठ असू शकली नसती असे प्रतिपादन केले आहे.

असो, थोडे विषयांतर झाले, पण 'इंग्रज नसते' या नाण्याची दुसरी बाजू 'स्वदेशी शासक असणे' अशी आहे. म्हणून लिहिले.