>लेखकाला ' मांसाहार करावा कि करू नये' यावर चर्चा हवी असावी.
= एकदम योग्य अर्थ.
शिवाय, लेखकाने आपल्या विचारांप्रमाणे स्वतःपुरता काय तो निर्णय घेऊन झालेलाच आहे. मग आता चर्चा कशासाठी?
= असं दिसत नाही, कारण लेखाचा शेवट बघा:
....गेले अनेक महिने तरी हे पथ्य पाळतो आहे. पुढे मागे संयम सुटणार नाही ह्याची काळजी नेहमी च घेत राहीन.
त्यांना या पेचातून बाहेर यायचंय आणि मला तर हेतू स्पष्ट दिसतोयं, लोक इतके वेगवेगळे अर्थ का काढतायंत?
मी तरी सुचवीन की प्रश्न संयंमाचा नाहीये, तुम्हाला जर एखादी गोष्ट करू नाही असं वाटत असेल तर फक्त मनाशी डिल करायचा प्रश्न राहतो आणि जिथे संभ्रम नाही, द्वंद्व नाही तिथे मन टिकू शकत नाही हे मी निर्विवादपणे सांगू शकतो. त्यामुळे संभ्रमात सरळ ज्या विषयी संभ्रम आहे ती गोष्ट न करणं तुम्हाला कोणत्याही पेचातून मुक्त करतं.
संजय