उगाच मी स्वामीची / गजानन महाराजांची भक्ती करतो म्हणून मी गुरुवारी मांसाहार करणार नाही (किंवा श्रावण पाळणे वगैरे .. ) हे उमगत नाही. (मी तर विचारीन असे का करतात लोक ? त्यानं नक्की काय साध्य होते ? ते स्वतःला फसवत आहेत की आपल्या गुरुंना ? )  

याला मी तरी फसवणूक म्हणणार नाही. कारण काही गोष्टी विशिष्ट रितीने करण्याने आपल्याला आनंद मिळतो. जसे देव तर सगळीकडे आहे पण आपण फक्त देवळात प्रवेश करताना पादत्राणे काढून ठेवतो. तसेच आपल्याला ज्यांचे महत्त्व वाटते त्यांना आवडेल असे वागण्याचा सर्वजण प्रयत्न करतात. आपल्या घरी आलेल्या एखाद्या आतिथी साठी आपण त्याला आवडणारे पदार्थ आवर्जून करतो . हे थोडेफार तसेच आहे असे वाटते. काही लोकं श्रावणच काय चातुर्मास सुद्धा पाळतात . कारण या दिवसात घरात किंवा आजुबाजूला अनेक धार्मिक सण , उत्सव  इ. असतात. म्हणजेच आपल्या धर्मिक समजुतींप्रमाणे देव अथवा देवतेचे वास्तव्य घरात अथवा परिसरात असते. त्यामुळे पुराणांमध्ये सांगितलेल्या आणि देवी-देवतांना आवडणाऱ्या गोष्टी आपण त्या काळात करतो, आणि न आवडणाऱ्या करायच्या टाळतो. यात मला वाटते कुणाचीच फसवणूक नसते. आणि साध्य हे की आपण ईश्वराला आवडेल असे काही करू शकलो हे समाधान .

तुम्हाला समिष आहार वाईट आहे असे म्हणायचे नाही . तसेच स्वामींची/महाराजांची भक्ती करतो म्हणून मांसाहार निषिद्ध वाटत नाही -- म्हणजे तुम्ही फक्त वैयक्तीक आवडीमध्ये बदल झाल्यामुळे मांसाहार न करण्याचा निर्णय  घेतला आणि आता तोबदल किती काळ टिकू शकेल
आथवा कायमस्वरूपी कसा टिकेल अशी तुम्हाला चिंता आहे का ?   कि तो निग्रह मोडू नये म्हणून काय उपाय करणे जरूर आहे असे तुम्हाला विचारायचे आहे?
तुम्ही घेतलेला निर्णय कोणत्याही बाह्य कारणाने नसून संपूर्ण पणे व्यक्तीगत असेल तर तो टिकण्याची खूपच जास्त शक्यता आहे.

मला अजूनही तुम्ही वर वर्णन केलेल्या तीन घटनांमध्ये जोडणारे एक समान सूत्र दिसत नाहीये.