सर्वच जण स्वयंप्रकाशी नसतात. मग त्यांनी प्रश्नाच्या उत्तराचा शोध इतरत्र घेतला आणि त्यांना तो पटला तर ते तसे करतील.

तुम्ही ही बाब उत्तम प्रकारे मांडली आहे. मुले माती खातात म्हणून जाणते त्याला मनाई करतात पण त्याने तसे करू नये म्हणून पर्यायही शोधतात. मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे खाऊ द्यावे. त्यांचे त्यांना समजेल तेव्हा त्यांची ती संवय जाईल म्हणून सोडून देतो काय? ते समजेपर्यंत ती टिकायला तर हवीत ना? तात्पर्य इतरांची मते जाणून घेणे म्हणजे मानसिक गुलामगिरी आहे असा शिक्का मारायचे कारण नाही.