>मुंबईतील हल्ल्यानंतर चिदंबरम यांनी निवेदन केले होते कीं प्रत्येक अतिरेकी हल्ल्यानंतर जरी शेजारी राष्ट्राकडे बोट दाखविले जात असले तरी घरभेदी अतिरेक्यांचे अस्तित्वही यात दिसून येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आवारात अलीकडेच झालेल्या स्फोटानंतरही त्यांनी याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान म्हणत आहेत कीं पाकिस्तानने पुन्हा आपली प्रशिक्षण शिबिरे कार्यान्वित केलेली आहेत. या दोन परस्पर विधानातून सामान्य जनतेने काय अर्थ काढायचा?<
याचा अर्थ सरळ आहे की चिदंबरम जोडले गेले आहेत. घरभेदी म्हणजे ते स्वतःच. काँग्रेस सरकारला सर्व काही दिसत असून गुन्हेगार सापडत नाहीत किंवा सापडलेल्यांना सुनावल्या गेलेल्या शिक्षा अंमलात येत नाहीत याचे कारण हे एक 'उघड गुपीत' आहे. नरेंद्र मोदींनी "टोपी" घालून घेतली नाही तरी मुसलमानांच्या भावना दुखावतात. पण हिंदूंना मात्र भावनाच नाहीत हे हिंदूंवर लादले गेलेले सत्य आहे. अन्यथा "सरबजितसिंगला माफी नाही" असे पाकिस्तान ठणकावून सांगायची हिंमत दाखवू शकते पण आपण मात्र अफजल गुरू आणि कसाबला हायकोर्टात जायला परवानगी देतो. ज्या देशाचा 'पंतप्रधान' अतिरेकी हल्ल्याचा बळी ठरूनही त्याला दया दाखवायला त्याची बायकोच उत्सुक असते तिथे सर्व सामान्य माणसाचा वाली कोण असणार? आता अण्णा हजारेंचे प्रेम पाकिस्तानला यायचे काय कारण? ही पण काँग्रेसची चाल असेल. त्यांना शांततेसाठी तिथे बोलवायचे आणि दगा-फटका करायचा आणि पाकिस्तानने केले आम्ही काय करणार? असा कांगावा करायचा. नाहीतरी ते काँग्रेसला भारीच ठरले आहेत.