मांसाहार करण्यात गैर काय आहे? फक्त गुरुवारच का सोडायचा? गुरुवार जसा दत्ताचा तसाच सोमवार शंकराचा, मंगळवार आणि शुक्रवार देवीचे, शनिवार मारुतीचा, मग हे बाकीचे  काय देव नाहीत? टी. व्ही. वरच्या मालिका बघून मांसाहार सोडायचे नाटक कशाला? मुळात इतकी भीती वाटते तर तो करायचाच कशाला? "जीवो जीवस्य जीवनम" असे एक संस्कृत सुभाषित आहे. म्हणजे एक जीव हा दुसऱ्या जिवाचे जीवन असतो. हा निसर्गाचा नियम आहे. माझ्याकडे एक सुविचार आहे. त्याचा जनक मला माहित नाही. पण तो फार चांगला आहे. " माणूस  तोंडाने जे भक्ष्यण करतो त्याने तो भ्रष्ट होत नाही तर त्याच्या तोंडून जे बाहेर पडते त्याने तो भ्रष्ट होतो". आमच्या सी. के. पी. ज्ञातीत आमच्या तुळजाभवानीला नवरात्राच्या अष्टमीला मटणाचा नैवेद्य लागतो. तो आम्ही देतो. कारण ती आमची कुलस्वामिनी आहे.