मेतकूटाच्या पोटात जे प्रतिसाद शिरले होते ते आता ठिकाणावर आल्याचे दिसत आहे. यात प्रशासकांची काही चूक नव्हती. मेतकूटाची पाककृती टंकलिखित करताना माझ्याकडून काहीतरी गफलत झाली आणि चुकून प्रतिसादाचे पान समोर आले. मेतकूट तयार व्हायचेच होते. सुपूर्त करण्यापूर्वीच प्रतिसाद मीच कसा काय देणार? पण त्या शिवाय मेतकूट काही पुढे सरेना. शेवटी मी कोऱ्या प्रतिसादावर टिचकी मारली आणि नंतर मेतकुटाची पाककृती पूर्ण केली. सुपूर्त करण्यापूर्वी मलाही ते पान  विचित्र दिसत होते. म्हणून मीच काही काळ तिथे पोचण्याची मुभा दिली नव्हती. शेवटी देऊन टाकली कारण पुन्हा सगळे टंकलिखित करणे जिकिरीचे वाटले. वेळीच मी प्रशासकांना कळवले असते तर आपणा सर्वांना इतका त्रास झाला नसता. तरीही आपण सर्वांनी मेतकूट वाचण्याचे कष्ट घेतलेत त्याबद्दल धन्यवाद! करून पाहिल्यावर अवश्य कळवा कसे झाले ते.
छाया