वापरलं जावं.
गेल्या तीन वर्षात माझा असा अनुभव आहे की बहुतेक लोक निव्वळ टाईमपास म्हणून प्रतिसाद देतात आणि त्यातून एकावर एक प्रतिसाद वाढत जातात त्यातून काहीही निष्पन्न होत नाही, असो, ज्याचा त्याचा दृष्टीकोन.
सवयीच्या संदर्भात सर्वांना उपयोगी होईल असा एक ज्योक सांगतो:
मुल्ला नसरूद्दिन दारू सोडायची ठरवतो आणि पक्का निश्चय करतो. संध्याकाळी घरी येतांना दुरून बार दिसल्यावर मुल्ला सॉलिड संयम साधतो आणि मनाला बजावतो, नाही म्हणजे नाही. बार जसजसा जवळ येतो तसतशी त्याचा संयम डोलायला लागतो पण स्वत:ला कसंबसं सावरत तो बार पार करून पुढे येतो. थोडा आणखी पुढे आल्यावर मग जरा मोकळा श्वास घेऊन स्वत:ची पाठ थोपटून घेतो, मुल्ला याला म्हणतात निश्चय! आता हा निश्चय रोज पक्का करत नेला की झालं, सुटली दारू! मग मनं म्हणतं ‘क्या बात है मुल्ला, कितने संयमी आदमी निकले, ऐसा तो शायदही कभी होता है, चलो इस बात को सेलिब्रेट करते है! आणि मुल्ला वळून बारमध्ये शिरतो!!
तुम्ही निश्चय, संयम वगैरेच्या मागे लागू नका त्या मानसिक प्रक्रिया आहेत, एकच ठरवा, आपल्याला जे योग्य वाटत नाही ते करायचं नाही, बास! तुमचं काम झालं!
मन म्हणजे आतला संवाद आहे, तो लॉजिकली, इमोशनली तुम्हाला भुरळ घालतो पण आपण आतल्या बडबडीकडे लक्षच दिलं नाही की मनाचा अंमल टिकू शकत नाही मग ती कोणतिही सवय असो की प्रसंग आपण त्यात सापडूच शकत नाही.
बघा आणि कळवा!
संजय