सवय म्हणजे जर सहज घडणारी गोष्ट असेल तर त्या बाबतीत संयम किंवा मुक्तता कशास शोधावी? हां, सवयीचे जर 'वाईट' सवय आणि 'चांगली' सवय असे दोन वर्ग कल्पिले तर वाइटापासून मुक्ती हे ध्येय असू शकते. इथे मला वाटते चांगले-वाईट ठरवण्यामध्येच संभ्रम आहे. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जिथे संभ्रम असेल तिथे ती गोष्ट ड्रॉप केलेली बरी.म्हणजे चांगले-वाईट ठरवता येत नसेल तर ते कृत्य न केलेले बरे. किंकर्तुम किमकर्तुम असा प्रश्न असेल तर 'अकर्तुम' हा ऑप्शन निवडावा असेच ना?

मांसाहार ही जर 'वाईट' सवय मानली तर त्या बाबतीत दावे-प्रतिदावे होऊ शकतात, जसे ते काही प्रतिसादांतून झालेले दिसतात.