मांसाहार करावा की करू नये?हा खरा मूळ मुद्दा. जो खर तर आरोग्य, वैयक्तिक पचनशक्ति, अन्नाची उपलब्धता , आवड यांचा विषय आहे. त्याला अनेक फाटे फुटून तो गांभिर्याकडून मनोरंजन पातळिकडे जाऊ लागला आहे. मुळात (माणसाचेच गुण अवगूण चिकटविलेले ) आपले देव ही संकल्पनाच रास्त कारणांखातर वादग्रस्त आहे. मुळात मी केलेल्या सावरकरांच्या सहज उल्लेखावरून 'टग्या' यांनी विषय अनपेक्षित्पणे सिरीयस केला. असे असले तरी भरकटत गेलेल्या या चर्चेत त्यांनी केलेल्या बहुसंख्य टिपण्यांशी मी तंतोतंत सहमत आहे. त्यांच्या या टिपण्यांमुळे चर्चा रंगली आहे. ज्या मूळ प्रश्नाचे उत्तर तसे सोपे आहे, व ते खरे तर केव्हांच अनेकांनी व्यवस्थित दिले असूनही मनोरंजक चर्चा चालूच आहे. मूळ चर्चेची सुरुवात ध्येयवादींनी केली पण यात भाग घेऊन 'टग्या' यांनि त्यात जी गम्मत आणली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद.