भाऊबंदकी, प्रेमभंग, मालमत्ता वगैरेसाठींच्या खुनाच्या केसेसमध्ये दयायाचनेची तरतूद समजू शकते, पण पंतप्रधानाची हत्त्या, लोकसभेवरील हल्ला यासारख्या पूर्वनियोजित, अतिरेक्यांनी आपल्या सर्व चाली नीट आखून केलेल्या खुनांच्या बाबतीत दयायाचनेची तरतूदच घटनेतून काढून टाकायला हवी. राष्ट्रद्रोह्यांना फुकट दया दाखवून "आधुनिक पृथ्वीराज चौहान" कशाला व्हायचे?