... याचा संबंध आहे असे मला वाटते. इथे मी वर उद्धृत केल्याप्रमाणे 'ताशेरे ओढण्याच्या' मानसिकतेबद्दल बोलत नाही. माझ्या मते व्यक्तीच्या मनातल्या भावना व त्या व्यक्तीच्या स्वभावाप्रमाणे त्याच्या आवडीचा संगीत प्रकार असू शकतो.

शांत स्वभावाच्या माणसाला शास्त्रीय तसेच हळुवार पद्धतीची गाणी आवडू शकतात. उत्साही माणसाला थिरकवण्यास लावणारी गाणी आवडू शकतात. हे मी जे माझ्या आजुबाजूला पाहिले आहे त्यावरून अनुमान काढले आहे. संगीत चिकित्सा नावाचा एक वैद्यकीय प्रकार आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात मानवी स्वभावाचा संगीताशी संबंध असावा असे वाटते.

राहिला प्रश्न दुसऱ्याच्या आवडीवर ताशेरे ओढण्याचा, ते तर इतर सर्वच बाबतीत होते. कपडे, घरातले फर्निचर, रंग, गाडी, खाणे इ. त्यामुळे अशा टीकेकडे लक्ष न देणे चांगले.