मुळात यांतले पहिले दोन  शब्द हे दीवाने-आम, दीवाने-खास या शब्दांवरून आलेले असले तरी त्यांचे मराठीतले प्रचलित अर्थ असे असावेत :
आमदार = विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा निर्वाचित सदस्य;  खासदार = लोकसभा किंवा राज्यसभेचा निर्वाचित सदस्य,
आणि नामदार =  विधानपरिषदेवर किंवा राज्यसभेवर नेमलेला सदस्य.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे कायदेमंडळावर नेमले गेलेले सदस्य  होते.

आमदारासाठी  हिंदीत विधायक हा शब्द वापरला जातो, आणि खासदारासाठी सांसद.