सविस्तर माहितीबद्दल आभारी आहे.
आता यावरून आणखी काही शंका:
आमदार = विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा निर्वाचित सदस्य; खासदार = लोकसभा किंवा राज्यसभेचा निर्वाचित सदस्य
- यातील 'निर्वाचित' या (सरकारी?) शब्दाचा अर्थ 'निवडला गेलेला' (selected किंवा elected यांपैकी कोणत्याही अर्थाने) असा असावा, अशी माझी समजूत आहे. ती योग्य आहे काय?
- 'निवडून आलेला'करिता ज्याप्रमाणे 'निर्वाचित' ही (सरकारी/अधिकृत?) संज्ञा असावी, त्याचप्रमाणे 'नेमलेला'करिता कोणती संज्ञा असावी बरे?
नामदार = विधानपरिषदेवर किंवा राज्यसभेवर नेमलेला सदस्य
- म्हणजे हा 'नामदार' शब्द 'नॉमिनी' अथवा 'नॉमिनेटेड पर्सन' अशा अर्थी असावा काय?
धन्यवाद.