सारण किवा भरण हे दोन पर्याय बरोबर असावेत.

स्टफ्फ्ड टोम्याटो = भरले टोम्याटो

पुष्टीबद्दल (तसेच अधिकच्या पर्यायाबद्दल) आभारी आहे.

 ग्रेवी - रस्सा ?

'ग्रेवी'करिता 'रस्सा' हा पर्याय सामान्यतः वापरता येण्यासारखा असला, तरी या विशिष्ट संदर्भात तो लागू होईल की नाही याबद्दल साशंक आहे.

जेव्हा एखादा पदार्थ हा ग्रेवीत शिजवलेला असतो, तेव्हा त्या एकंदर प्रकाराला त्या पदार्थाचा रस्सा म्हणणे, आणि त्यातील ग्रेवीच्या भागाला 'रस्सा' असे संबोधणे मला वाटते उचित ठरावे. परंतु एखादा पदार्थ वेगळा शिजवलेला असल्यास आणि नंतर केवळ एक पर्याय म्हणून स्वतंत्रपणे शिजवलेली आणि स्वतंत्र अस्तित्व असलेली ग्रेवी त्यावर स्वतंत्रपणे ओतणे असल्यास (म्हणजे भातावर वरण ओतून घेतल्याप्रमाणे, जे टर्की आणि ग्रेवीच्या बाबतीत होते. वरणभातात वरण आणि भात हे स्वतंत्रपणे शिजवलेले असतात, आणि वरण हा कोणत्याही प्रकारे भाताच्या पाककृतीचा भाग नसतो, तसेच.), त्या परिस्थितीत त्या ग्रेवीला 'रस्सा' म्हणून संबोधणे कितपत सयुक्तिक आहे, याबाबत साशंक आहे.