निर्वाचित हा शासकीय(म्हणजे सरकारी! ) शब्द सार्वत्रिक निवडणुकातून मतदानाद्वारे निवडून गेलेला अशा अर्थाने वापरला जात असतो. ज्याला आपण मराठीत निवडणूक आयुक्त म्हणतो तो सरकारी भाषेत निर्वाचन आयुक्त (इलेक्शन कमिशनर) असतो. निवडणे या शब्दाचे, एकाच्या मतानुसार निवड होणे किंवा बहुमताने निवड करणे असे दोन्ही अर्थ मराठीत होत असल्याने निर्वाचन हा शब्द नाईलाजाने वापरावा लागला.

नामदार म्हणजे बहुधा नॉमिनेटेड सदस्य असा अर्थ असला पाहिजे. त्यामुळे विधानपरिषदेत किंवा राज्यसभेत जे काही १२-१४ लोक सरकार नेमते त्यांनाच नामदार म्हणायला पाहिजे. महाराष्ट्राच्या इतिहासात किती नामदार होऊन गेले याचा अभ्यास करायला पाहिजे. मात्र हल्ली हा शब्द वाचायला मिळत नाही, ही गोष्ट खरी.  याच अर्थाने जुन्या मराठीत नामजात-नामजाद ही विशेषणे वापरात होती. नामदार म्हणजे नामजाद सदस्य असा अर्थ बहुधा असावा.