पश्चात ताप म्हणजे मागाहून होणारा अथवा झालेला ताप. तुम्ही एखादं कर्म केलंच पाहिजे, तरच त्या बाबतीत पश्चात तापाची शक्यता असते असं काही नाही. एखादं कर्म न करताही पश्चात्ताप होऊ शकतो. उदा. मुलाला शाळेतून घरी आणायचं आहे आणि आईने ते काम केलं नाही. यानंतर कितीतरी पर्यायी प्रसंग घडू शकतात. १) मूल भुकेने कासावीस झालं. रडून रडून त्याचा घसा सुकला.२)ते उन्हात इतस्ततः भटकू लागलं. अती उन्हामुळे त्याला उष्माघात झाला.३) ते स्वतःच चालत चालत घरी यायला निघालं आणि उन्हाने करपलं(पुन्हा उष्माघात)/वाट चुकून हरवलं/रस्त्यात एकटं चालताना बघून कुणीतरी त्याला पळवलं.

आता हे सर्व शक्य परिणाम निस्तरताना जो ताप होईल त्याला पश्चात्तापाशिवाय दुसरे काय नाव देता येईल?

काम न करण्याचाही पश्चात्ताप घडू शकतो.