शिवाय शब्दाचा अर्थ त्या संदर्भातच बघावा लागतो तर लेखकाला काय म्हणायचंय ते कळेल
इथे नॉनवेज खाऊ की नको असा प्रश्न आहे त्यामुळे 'खाल्लं तर पश्चाताप (म्हणजे मानसिक द्वंद्व : भक्ती, भ्रष्टता, संयम, आणि शेवटी स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत कमी होणं)
नाही खाल्लं तर फक्त हुरहूर 'की अरे मजा आली असती'
ट्राय टू अंडरस्टँड, मन दोन्ही बाजूनी वाजणारा ढोलक आहे, खाल्लं तर तुम्हाला संयम नाही, तुमची भक्ती व्यर्थ आहे हे तुम्हाला पटवून देणार आणि तुम्हाला ते जाम निस्तरता येणार नाही कारण तुम्ही ती गोष्ट केलीये.
तुम्ही नाही खाल्लं तरी मन तुमची हेटाळणी करणार, काय मस्त चान्स होता, त्यांचं मन राखायला हवं होतं, असा स्वतःचा हेका चालवणं ठीक नाही, महाराज खात नसतील कशावरून? तुम्ही काय बघायला गेला होता का? बरं हे महाराज खात नसतील ते खात होते ना? मग ते काय सिद्ध नव्हते का? पण तुम्ही मनाकडे दुर्लक्ष करू शकाल, तुम्ही म्हणू शकालः
'मला नव्हतं खायच मी नाही खाल्लं, बास्स!
तेच मी तुम्हाला सांगतोय, मन फक्त तुम्ही संभ्रमात असाल तरच काम करतं, खरं तर संभ्रम म्हणजेच मन, अशा संभ्रमात एकच उपाय आहे, ज्या विषयी संभ्रम आहे ती गोष्ट न करणं!
संजय