तोंडी लावल्याप्रमाणे गांधिजींचे ऊठसूट नाव घेणारे आणि ही कविता यांची भेट होण्याची सुतराम शक्यता नाही. चुकून झालीच तर ते म्हणतील, ' निवडणूक लढवून दाखवा म्हणजे कळेल की महात्माजी कोणाच्या बाजूने आहेत ते! तुमचे डिपोझिट देखील वाचणार नाही त्यांनी दाखवलेल्या मार्गावरूनच आम्ही जातो आहोत हे जनता जाणते . शेवटी सत्यमेव जयते. महात्मा गांधीकी जय!' आणि खरेच आजवर तसेच होत आलेले आहे. आपणही याच लायकीचे आहोत असे सिद्ध करीत आलो आहोत. जसे आपण तसे आपले नेते! आदरणीय अण्णांनाही सुरुवातीला हेच जाहीरपणे सुनावले जात होते. जनतेचा तो उत्साह जोवर कवितेतील नेत्याला निवडणूकीत अस्मान दाखवीत नाही तोवर आपण कविता आणि लेख पाडत राहायचे आणि यांनी त्याला हसायचे!