कॉम्प्युटर फाईलांच्या संदर्भात फोल्डरला कप्पा हा प्रतिशब्द बरोबर वाटतो. पण कागदपत्रे ठेवण्यासाठी कार्यालयांत कागदी घडी जी वापरली जाते त्याला कप्पा हा प्रतिशब्द बरोबर वाटत नाही. 'पत्रघडी' हा त्यासाठी प्रतिशब्द असू शकतो. एका फोल्डर या इंग्रजी शब्दासाठी असे संदर्भानुसार दोन प्रतिशब्द असायला हरकत नसावी.