माझ्या मते ह्या विषयावर मनोततावर पहिलेच चर्चा खूपं झाली . आणि आता ह्या चर्चेत मी का खावं ?,आणि का खाऊ नये? असा एक प्रश्न विचारला होता. आपला मागचा इतिहास जर बघितला (बुद्धकाळाच्याअगोदरचा) तर आपल्याला आपण सर्व मांसाहारी होतो अगदी पौरहित्य करणारा समाज देखिल . वानगी दाखल
१) अश्वमेध यज्ञाचा फलश्रुती म्हणून जो अश्व बळी दिला जायचा त्यात अश्वाचे डोके राज परीवरला, चार पाय प्रधान मंडळीस, आणि छातीचा जो भाग होता तो पुरोहित वर्गाला यज्ञाचा प्रसाद म्हणून दिला जायचा.
२) आजच्या काळात जे आपण श्राद्ध संकल्प करतो तर , पूर्वीच्या काळी पितरांना अन्न म्हणून मांस आणि मद्य दिले जायचे. आजही जे आपण खीर आणि उडदाचे वडे करतो हे मांस आणि मद्याचेच प्रतीक आहे. मांसातील कॅलेरीज (ऊर्जा) आणि उडीद वड्यातील कॅलरीज ही जवळपास सारखीच आहे आणि तांदुळाची खीर म्हणाल तर कधी खीर प्रमाणा बाहेर पिऊन बघा खिरीचा अंमल डोळ्यांवर चढेलच चढेल. कदाचित आपण हा अनुभव घेतला देखिल असेल.
आता ध्येयवेडा ह्या लेखकाची घालमेल जी जीवाची घालमेल होतेय ती मांसाहार भक्षण केल्यामुळे होत असावी कारण राजा पुष्यमित्राच्या काळापासून पुरोहित वर्गास एक अलिखित दंडक जगद्गुरू शंकराचार्यांनी घातला की मांस आणि मद्य भक्षण हे पुरोहित वर्गास निषिद्ध आहे! . आता त्या काळानुरूप (जास्त खोलात नको.. ) घातलेला हा दंडक पाळणारी मंडळी आहे आणि तसे संस्कार त्यांनी लहान पणापासून आपल्या पिढीवर केलेले आहेत. त्या संस्काराचे हे द्वंद आहे की खाऊ? की नाही. शास्त्रात हे ठरावीक वर्गाने खावे आणि ते खाऊ नये असा कोणताही उल्लेख माझ्या तरी बघण्यात आला नाही. वरील माहिती ही वाचिक आहे कृपया नोंद घ्यावी. आणि जर तसा आपल्या कोणाच्या वाचनात आला असल्यास संदर्भ देऊन माझ्या ज्ञानात भर घालावी