आहार आणि संवेदनाक्षमता यांचा जवळचा संबंध आहे. शरीर हे अन्नाचं रूपांतरण आहे आणि मन हा शरीराचाच सूक्ष्म भाग आहे त्यामुळे जसा आहार तसं शरीर आणि तसे विचार अशी साखळी आहे.
सर्वांना उपयोगी होईल म्हणून हा प्रसंग सांगतो. लग्नापूर्वी (जेव्हा तिच्याशी फार जुजबी ओळख होती) मी बायकोला घेऊन ‘द प्लेस’मध्ये सिझलर खायला गेलो, कोणत्याही आनंदाचं सेलिब्रेशन फ्राइड चिकन विथ पायनॅपल सिझलर खाऊन करायचं अशी माझी आयडिया होती, (यू कॅन इमॅजीन द मूड, लग्नापूर्वी एका तरूणी बरोबर आणि तेही द प्लेस सारख्या रेस्टॉरंटमध्ये) तीनं वेज सिझलर मागवलं. मी काय घ्यावं यावर तीचं काही ऑबजेक्शन नव्हतं पण माझं सिझलर आल्यावर ती म्हणाली ‘तुमचा स्वभाव आणि आहार एकमेकांशी जुळत नाहीयेत! ’ माझा इगो वगैरे इन्फ्लेट होण्याचा प्रश्नच नव्हता कारण इतक्या किरकोळ गोष्टीवरनं मी आपली आवड बदलणं शक्य नव्हतं. पण मला ती गोष्ट इतकी प्रकर्षानी जाणवली, समोर दिसली की मी म्हटलं, ‘यू आर राइट, हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं नॉनवेज’. या घटनेला आज पंचवीसहून अधिक वर्ष झाली मी कधीही नॉनवेज खाल्लं नाही की आता उर्वरित आयुष्यात खाणं शक्य नाही. मला वाटतं तुमची संवेदनाक्षमता तुमचा आहार ठरवते.
संजय