दोन्ही खाणे शक्य असताना (आणि उपलब्ध असताना)...

ह्यावरून आठवले. पूर्वी मला "मांसाहार करता ना तुम्ही? " असे कुणी विचारले, की मी सांगत असे, "पर्याय/निवड शक्य असेल तर शाकाहार निवडतो"....

पण नंतर मांसाहाराचे एक दोन 'प्रयोग' करताना लक्षात आले की ह्या उत्तरात तसा काही अर्थ नाही. मांसाहारी पदार्थांत दिसणारे प्राण्यांच्या शरीरातले आकार पाहून ते खाणे नकोसे वाटते आणि कुणी ते आकार उकार काढून दिले(आणि समजा डोळे मिटून खाल्ले) तरी चव बीव विशेष आवडत नाही... जी काय चव/स्वाद असतो तो मसाल्याचा असतो (असे मला वाटते) तेव्हा एव्हढा त्रास का करून घ्या; आपण अगदी उपाशी राहणार असलो तर कदाचित मांस खाऊ, असे आता वाटते. (तरीही मांसाहारी पदार्थाव्यतिरिक्त काहीही खायला मिळण्याची शक्यता नाही अशा परिस्थितीत दुधावर एखादा दिवस काढण्याचा अनुभव आहे!... आणि दोन्ही पर्याय शक्य असताना भुकेल्या पोटी क्वचित नकळत मांसाहार केला गेल्याचाही अनुभव आहे!... दोन्हीचे काही विशेष वाटले नाही, हे मात्र खरे)