"आम्ही इंग्रजांना घालवले पण त्यांची शिक्षणपद्धती आजतागायत कवटाळून बसलोच आहोत. "
मग नक्की कोणती शिक्षण पद्धती चांगली? तिकडे ओबामा म्हणतो भारताची शिक्षणपद्धती चांगली. मग नक्की चांगली कुठली?

" किमान ५० टक्के विद्यार्थ्यांना तरी व्यावसायिक शिक्षण द्यायला काय हरकत आहे"
यातून काय अभिप्रेत आहे? व्यावसायिक शिक्षण म्हणजे नक्की कुठले? जो उद्योग उभा करतो तोच फक्त  व्यावसायिक शिक्षण घेउन आलेला असतो का? अभियांत्रीकी हे व्यावसायिक शिक्षण नव्हे काय? आणि ५०% लोकांनी स्वतःचे उद्योग उभारल्यावर तिथे काम कोण करणार? ३% नोकऱ्या वगैरे आकडे कुठून आले?

या लेखातून मलातरी फक्त एवढाच निष्कर्श काढता आला की "शेती हा फक्त तोट्यातच जाणारा व्यवसाय आहे. त्यातून भारतातल्या शेतकऱ्यांना कधीच फायदा होत नाही. " हे खरे आहे काय? १ शेतकरी आत्महत्या करतो पण बाकीचे ९९ शेती करूनच पोट भरत असतात. एक हंगाम शेती करून शेतकरी लगेच उद्योग उभारण्याएवढा श्रीमंत व्हावा अशी अपेक्षा आहे काय? अतिशय एकांगी लेख आहे. अगदी बाबा आढाव, शरद राव, शरद जोशीं इत्यादी राजकारण्यांच्या भाषणासारखा.