मी व्यवसायानी यंत्र अभियंता आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योग चालू करायचा प्रयत्न केला होता. त्यासाठी लागणार्या परवान्यांची एक कल्पना वाचक बंधु-भगिनिन्ना यावी ह्यासाठी खालील यादी देत आहे.
१. अन्न आणि औषध निरीक्षण समिती चा परवाना. (फूड & ड्रग आडमीन कमिटी). (दर १ वर्षानी नुतनिकरण + त्यासाठी लागणारे "पैसे".)
२. अग्निशमन दलाचा परवाना. (आश्चर्याची गोष्ट इथे एक पैसाही मागितला गेला नाही.)
३. स्थानिक पोलिस महानिरीक्शकाची परवानगी. (ही मिळायसाठी त्यांचे हात ओले करणे. )
४. सार्वाजनिक बांधकाम विभागाचे परवाने. (परत हात ओले. )
५. व्यावसाईक वीज जोड मिळवणे. (हात अतिशय जास्त ओले करणे. )
६. कामगार कल्याण विभागाचे प्रमाणपत्र. (इथे "ओल"खी शिवाय काम होत नाही. त्यासाठी स्थानिक आमदार / खासदाराचे शिफारस पत्र. )
इथे प्रत्येक परवाना मिळायसाठी खालील कागद पत्रे लागतात.
१. रेशन कार्ड. (बांगलादेशी नागरीकाला मिळत लवकर. )
२. कमीत कमी २ वर्षाचे कर प्रमाणपत्र.
३. ज्या ब्यांकेकडून कर्ज घेणार असाल तिथे गहाण म्हणून ठेवायला लागणारी घराची, जमिनीची कागदपत्रे व दाखले. (सातबारा साठी तलाठी साहेबांचे हात ओले करणे.
४. सरकारी गुंतवणूक म्हणून "राष्ट्रिय बचत पत्रे".
आता मला सांगा इथे "उद्योग सुरू" करणे कित्ती सोप्पे काम आहे ते.
आणि हो हे सगळे हात धुण्यासाठी कमीत कमी ४-६ लाख रुपये एवढे किरकोळ रक्कम लागते. आधी व्यवसाय सुरू करायसाठीची रक्क्म कर्ज म्हणून घ्यायचे धाडस करायची माझी तयारी होती. पण हे हात धुवायचे काम करायला लागणारी किरकोळ रक्कम माझ्याकडे नसल्याने २ वर्षाचे नियोजन वाया गेले आणि अशा प्रकारे अस्मादीक एका जर्मन कंपनी मध्ये चांगल्या पगाराच्या गुलामगिरी मध्ये अडकले.
व्यवसाय सुरू करून तो वाढ्वायची तयारी असताना ह्या परवाना राज मुळे नोकरीचे जोखड आणि व्यावसायिक व्हायचा मानस अपूर्ण राहीला.