हा विषय महाभारतासारखा आहे
तीन प्रकारच्या सायकीज आहेत : एक नैतिक, म्हणजे योग्य-अयोग्य यात गुरफटलेली, अ लाइफ बेस्ड अपॉन शिअर लॉजिक, धर्मराजासारखी, त्याला जर एखादी गोष्ट नैतिकदृष्ट्या योग्य वाटली तर तो ती करेल, मग ते युद्ध का असेना.
दुसरी भीमासारखी, जिथे विचारच नाही, नुसती ऍक्शन! युद्ध तर युद्ध, एकदा लोळवायचा म्हटल्यावर लोळवायचा, मग तो स्वत:चा भाऊ का असेना. खायचं म्हटल्यावर खायचं मग विचार नाही, तुडव!
तिसरी अर्जुनासारखी चित्तदशा आहे, संवेदनाक्षम! आणि तिथे संभ्रम आहे! तुम्ही त्याला कितीही नैतिकदृष्ट्या पटवून द्या, कसाही भरीला घाला, त्याची स्वत:ची क्षमता कितीही असो त्याला एखादी गोष्ट नाही करवत म्हटल्यावर नाही करवत.
माझे सर्व प्रतिसाद संवेदनाक्षम लोकांसाठी आहेत, ज्यांना संभ्रम आहे, तुम्ही काय करावं हा तुमचा प्रश्न आहे पण संभ्रमात असाल तर ती गोष्ट करू नका (ही पहिल्यांदाच सांगीतलेली गोष्ट) सांगून मी आता हा विषय संपवतो.
संजय