संजयजी जर तुमच्या पत्नीचा तुमच्या नॉनव्हेज खाण्याला विरोध नव्हता तर फक्त ‘तुमचा स्वभाव आणि आहार एकमेकांशी जुळत नाहीयेत!  ’या एका वाक्यावर तुम्ही खाणं का सोडलंत? याचाच अर्थ असा की कुठेतरी तुमचा इगो दुखावला. नॉनव्हेज हा तामसी आहार मानला जातो. असं म्हणतात की माणूस जसं अन्न खातो तसा त्याचा स्वभाव बनतो. पण जर तुम्ही त्याला सन्माननीय अपवाद होतात तर तुम्हाला खाणं सोडायची गरज का वाटली? ही चर्चा बरीच पुढे गेली आहे. पण मध्ये काही दिवस आमचे इंटरनेट बंद होते. त्यामुळे मी मागे पडले आहे.