तो शब्द वापरून कुणाचीही विकेट काढायचा प्रयत्न करतो.
प्रथम तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, माझं आकलन एकवेळ अपवादात्मक असेल पण शरीर इतरां सारखंच आहे म्हणजे जसा आहार तसाच त्याचा शरीरावर परिणाम होईल.
इगोचा इथे अपेक्षित अर्थ आहे माझी इमेज आणि तीही कुणाच्या तर माझ्या होणाऱ्या पत्नीच्या मनातली, किंवा यू कॅन टेक इट धिस वे की तिला इंप्रेस करायला मी नॉनवेज सोडलं. नाही तसं अजिबात झालं नाही, आपल्या हातून कमीतकमी हिंसा व्हावी या संवेदनाक्षमतेतून की जी तिनी लक्षात आणून देण्यापूर्वी मला नव्हती, मी नॉनवेज सोडलं.
आणि त्यावेळी तर मी सत्य शोधत ही नव्हतो, माझा सत्याचा बोध सतरा अठरा वर्षापूर्वीचा असेल, घटना पंचवीस वर्षापूर्वीची आहे.
मी आज ही स्वतःला जस्टिफाय करत नाही, मला नाही पटलं मी सोडून दिलं एवढच मी सांगतोय; आणि थोडं पुढे जाऊन त्याचा मला सत्य शोधायला उपयोग झाला हे जे मला समजू शकतात त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय.
संजय