अपलोड करता आले तर उत्तम. नाहीतर नमुन्याचा दुवा प्रशासकांच्या मदतीने द्यावा. त्यावरून कांही मत व्यक्त करता येईल. शास्त्रीय संगिताला ' लागला विव्हळायला ' असे म्हणणारे सापडतातच की. तुम्ही म्हणता त्या प्रकारचे संगित आवडल्यास अपमानित केले जात असेल तर गंभीर बाब आहे. कदाचित त्याला तसेच कांही कारण असू शकते. माझ्या समोर बसून एखादा जर कर्णकर्कश आवाजात किंचाळायला लागला व अनाकलनीय शब्दात संगिताचा हा अमूक एक प्रकार आहे असे सांगत कांही बाही बरळू लागला तर त्यापासून मी दूर राहीन. उदा. पॉप संगित! पण ते बहुसंख्याना आवडत असेल तर आपण काय करू शकतो? जगात वेगवेगळ्या प्रकारच्या संगिताचे भोक्ते असणे ही तशी चांगलीच गोष्ट आहे.